जागेच्या मोबदल्यात लष्कराकडून 200 कोटींच्या कामाची मागणी
पुणे – महापालिका हददीतील जुन्या पुणे – मुंबई रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम अडचणीत सापडले आहे. या रस्त्यावरून मेट्रो तसेच बीआरटी मार्ग जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे गेली अनेक वर्षे रखडलेले रूंदीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी पालिकेकडून खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्डच्या हद्दीतील खडकी परिसरातील सुमारे अडीच कि.मी. रस्त्याची जागा रुंदीकरणासाठी मागण्यात आली होती. मात्र, या जागेच्या मोबदल्यात लष्कराने एक उड्डाणपुल अथवा ग्रेड सेपरेटर आणि दोन भुयारी मार्ग अशी कामे करून देण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. या कामांसाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याने महापालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झालेली आहे.
No comments:
Post a Comment