शहर होऊ लागले मोकळे : एसटी व खासगी बसना प्रचंड गर्दी
पिंपरी, (प्रतिनिधी) – उद्योगनगरीतील नागरिकांनी दिवाळीसाठी सध्या गावाकडची वाट धरली आहे. शहरातून जाणारी प्रत्येक बस आणि रेल्वे हाऊसफुल्ल होऊन धावत आहे. वल्लभनगर एसटी स्थानक तसेच खासगी बस जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर सध्या प्रचंड गर्दी आहे. नोकरी-व्यवसाय आणि शिक्षणासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या बहुतेकांना ही दिवाळी गावाकडेच साजरी करण्याचा निश्चय केला आहे.
No comments:
Post a Comment