पिंपरी – आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. अनिल रॉय यांच्या ऐवजी शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरणारे डॉ. पवन साळवे यांची नेमणूक करण्याचा ठराव विधी समितीने नुकताच पारित केला. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेऊन साडेचार वर्षानंतर पदोन्नती योग्य नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याचा आरोप डॉ. रॉय यांनी केला. या आरोपाने पालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. रॉय यांना प्रशासकीय नोटीस बजावली आहे. यासंदर्भात 24 तासाच्या आत समाधानकारक खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सक्त सूचना हर्डीकर यांनी दिली आहेत. त्यामुळे डॉ. रॉय यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.
No comments:
Post a Comment