पिंपरी – केंद्र शासनाच्या “स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत शहराचा पायाभूत विकास साधण्यासाठी नियोजित आराखड्यातील कामकाज हाताळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेतील परवाना आणि कायदा विभागाचे गांधीनगर येथील सावित्रीबाई फुले ग्रंथालयासाठी बांधलेल्या नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने ग्रंथालय रद्द करण्याचा निर्णय घेऊन शहराच्या वाचन संस्कृतीवर घाला घालणार असल्याची टीका वाचनप्रेमींमधून होत आहे.
No comments:
Post a Comment