पिंपरी - तुरुंगातून जामिनावर सुटलेला विजय मल्ल्या घरी पोचलादेखील... मात्र, आम्ही अजूनही हिंजवडीमध्ये सिग्नललाच आहोत..., अशी हिंजवडीत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शोकांतिका मांडणारा विनोद सध्या सोशल साइटवरून वेगाने फिरतोय. तसेच, रोज रात्री घरी येणारे ते दोघे कोण? या नातीच्या भाबड्या प्रश्नाला हिंजवडीत काम करणारे ते तुझे आई-बाबा आहेत, असे उत्तर देणाऱ्या आजीचा विनोदही सर्वांनाच भावतोय. आतापर्यंत संपूर्ण जगभरात आदराचे स्थान असणाऱ्या हिंजवडीच्या समस्यांवर होणारे हे विनोद अंतर्मुख करायला लावणारे आहेत. त्यात आणखी भर पडण्यापूर्वी शासनाने जागे व्हायला हवे, अशी प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment