पुणे - लक्षणे दिसताच अगदी काही मिनिटांमध्ये डेंगीच्या तापाचे निदान करणे "डेंगी डे 1 टेस्ट'मुळे शक्य झाले आहे. रुग्णाला संसर्ग झालेला विषाणू नेमका प्राथमिक अवस्थेत आहे की तो दुसऱ्या टप्प्यावर पोचला आहे, याची माहितीही यातून अचूक मिळणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णावर वेळेत, प्रभावी उपचार आणि डेंगीचे व्यवस्थापन करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. डेंगीच्या या निदान चाचणीचा खर्च चार पटीने कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment