पिंपरी-चिंचवड वर्तमान – अमोल शित्रे
आशिया खंडात नावारुपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला अधिकारीच आतून पोखरू लागले आहेत. प्रशासकीय सेवा बजावताना करदात्यांच्या पैशातून मिळणाऱ्या वेतनातून समाधान न मानता चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांपासून ते प्रथम वर्ग दर्जाच्या अधिकाऱ्यांना सुध्दा छुप्या मार्गाने पैसे कमावण्याचा हव्यास सुटला आहे. 25 हजारापासून ते दीड लाख रुपयांहून अधिक मासिक वेतन उचलणारे अधिकारी देखील काळ्या मार्गाचा अवलंब करत आहेत. चार-दोन हजार रुपयांचा मलिदा लाटण्यासाठी बिले अडवून धरणे, अनधिकृत घरांवर कारवाई न करणे, बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांना पाठिशी घालणे, अवैध नळ कनेक्शनवर कारवाईस टाळाटाळ करणे, एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीपासून ते आयुक्तांच्या टेबलावर फाईल सरकवत नेण्याच्या मार्गातील प्रत्येक टेबलावर चिरीमिरी घेतली जात आहे. अशा लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत आहे. आजपर्यंत अधिकारी, कर्मचारी अशा 21 जणांची महापालिकेची इभ्रत वेशीवर टांगली आहे.
No comments:
Post a Comment