Monday, 1 January 2018

सभापतींचाच सभेवर बहिष्काराचा इशारा

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्याकडे या विभागाबरोबरच भांडार, सुरक्षा आणि अतिरिक्त आयुक्‍त पदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विकास विभागाचे कामकाज वेळेत होत नसल्यामुळे लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या विभागासाठी स्वतंत्र सहायक आयुक्ताची नेमणूक करावी अन्यथा महिला व बालकल्याण समितीच्या पुढील सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सभापती सुनीता तापकीर यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment