पिंपरी - महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यावर त्वरित उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी प्रमुख आजारांशी संबंधित औषधे बऱ्याचदा बाहेरून विकत घ्यावी लागतात. पार्किंगसाठी असलेली अपुरी व्यवस्था, रुग्णाच्या नातेवाइकांना बसण्यासाठी कमी प्रमाणात असलेल्या खुर्च्या तर, उपलब्ध डॉक्टरांचे अल्प प्रमाण अशा कोंडीत हे रुग्णालय सापडले आहे.

No comments:
Post a Comment