निगडी पर्यत मेट्रो पहिल्या टप्प्यात नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 29 ऑक्टोबर 2013 ला मंजूरी दिली आहे आणि केंद्र शासनाने 7 डिसेंबर 2016 ला मंजूरी दिली आहे असे असताना पालकमंत्री आणि सत्ताधारी पक्ष निर्णयाची अंमलबजावणी करायला विलंब का करत आहेत? याकडे जनतेच्या माध्यमातून आवाज पोहचवण्यासाठी पिंंपरी चिंचवड सिटीझन फोरम (PCCF) आता अधिक व्यापक मोहीम राबवणार आहे. आम्ही मिस्ड कॉल मोहीम सुरु केली आहे. माननीय खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे यांनी मिस्ड कॉल देऊन मोहिमेला पाठिंबा दिला! त्यांनी नागरिकांना आव्हाहन केले आहे “जास्तीतजास्त लोकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे”.
सर्वांनी आपल्या मोबाईलवरुन या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहभाग नोंदवा - 08030636448

सर्वांनी आपल्या मोबाईलवरुन या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहभाग नोंदवा - 08030636448

No comments:
Post a Comment