पिंपरी - कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र "बंद'ला पिंपरी-चिंचवड शहरात काही किरकोळ दगडफेक व तोडफोडीचे प्रकार वगळता संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठा, मंडई, हॉटेल्स, मॉल, सिनेमागृह दिवसभरासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले. काही अपवाद वगळता अन्य शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली, तर शासकीय, नीमशासकीय कार्यालये, महापालिकेचे व्यवहार सुरळीत सुरू होते. काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी एमआयडीसीतील काही कंपन्या बंद होत्या. काही नियमित सुरू होत्या. शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त होता. सकाळी सुरू असलेली पीएमपी बस सेवा दहाच्या सुमारास अचानक बंद केल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.

No comments:
Post a Comment