गेल्या दहा वर्षांतील शिरस्त्याप्रमाणे पीएमपीमध्ये कार्यकाळ पूर्ण न करताच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची बदली झालीच. पीएमपीचे पोस्टिंग ८-१० महिन्यांसाठीच असावे, असा राज्य सरकारचा समज झालेला दिसतो. मुंढे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती स्वीकारल्यावर धडाडीने कामकाज करण्यास सुरवात केली. काही घटकांना कटू वाटतील, असे निर्णयही त्यांनी परिणामांची पर्वा न करता घेतले. त्यामुळे कामगार संघटना आक्रमक झाल्या. ठेकेदारांची लॉबी दुखावली गेली अन् मुंढे यांच्याबद्दल तक्रारी सुरू झाल्या. एखाद्या अधिकाऱ्याबद्दल राज्य सरकारकडे तक्रारी होण्याच्या घटना नव्या नाहीत. परंतु, प्रश्न एखाद्या व्यक्तीचा नाही तर, त्याने सुरू केलेल्या सुधारणांच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा आहे.

No comments:
Post a Comment