पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा ‘व्हिजन २०-२०′ ला समरुप आहे. या अर्थसंकल्पात ‘व्हिजन २०-२०′ मधील कामांना चालना दिली आहे. समाविष्ट गावात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. आरक्षणे विकसित केली जाणार असून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होलीतील गृहप्रकल्पाच्या कामांना प्राध्यान्य दिले असून ही कामे २०२० पर्यंत पुर्ण होणार आहेत, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. तसेच भाजपने महापालिका निवडणुकीवेळी दिलेली आश्वासाने पुर्ण करण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत, असेही आमदार लांडगे यांनी सांगितले. या अर्थसंल्पामुळे व्हिजन २०२० पुर्ण होण्यास मदत होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment