निगडी – भारत सरकारच्या नीती आयोगामार्फत ‘अटल टिंकरिंग मेरेथोन’ ही राष्ट्रीय संशोधन प्रकल्प स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवडण्यात आलेल्या तीस प्रकल्पांमध्ये चार प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून निवडण्यात आले. या चार प्रकल्पांपैकी निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या दोन प्रकल्पांची निवड झाली.
No comments:
Post a Comment