पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाचा रविवारी (दि.४) सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या रंगतदार गायनाने समारोप झाला. पूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर गुरुवारपासून चार दिवसीय स्वरसागर महोत्सवाला प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत रविवारी(४ फेब्रुवारी) सध्याच्या पिढीचे लाडके गायक महेश काळे यांनी आपल्या रंगतदार गायनाने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले. मोठ्या संख्येने जमलेल्या रसिकांच्या मनावर महेशने आपल्या सुरांचे गारुड घालून त्यांना मंत्रमुग्ध केले. केवळ महेश काळे यांचे गायन ऐकण्यासाठी जमलेल्या लहानथोर सर्वच रसिकांना महेश यांनी आपल्यासह गायनात सामिल करुन घेऊन एक वेगळाच समा बांधला.

No comments:
Post a Comment