निगडीपासून मेट्रोची सुरुवात व्हावी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची आग्रही मागणी पिंपरी-चिंचवडमधून होत आहे. यासाठी गेली पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला जात असूनही अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये नागरीकांसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या निगडी मेट्रोबाबत तरतूद करण्याची मागणी आता जोर पकडत आहे.


No comments:
Post a Comment