Tuesday, 10 April 2018

असुरक्षिततेचा “जोहार’

  • पिंपरी-चिंचवड वर्तमान
मोगलाईच्या काळात मोगलांच्या अत्याचारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी राजपूत स्त्रिया “जोहार’ करून स्वत:ला संपवायच्या. “पद्‌मावत’ चित्रपटामुळे या इतिहासाची उजळणी होत असतानाच पिंपरी-चिंचवडसह मुंबईत घडलेल्या घटनांमध्ये आपली अब्रु वाचवण्यासाठी तिघींनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. लागोपाठ घडलेल्या या तिन घटनांमुळे शिवछत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील महिला सुरक्षिततेचे अक्षरशः धिंदवडे निघाले आहेत. कुटुंबातही महिला सुरक्षित नाहीत. निरागस चिमुकलीपासून ते दोन-तिन पिढ्यांचे उन्हाळे-पावसाळे पाहणाऱ्या आजीबाई वासनेच्या बळी ठरत आहेत. घरी-दारी वसवसलेल्या नजरा, ढिसाळ सुरक्षा यंत्रणा, अत्याचारीत महिलांनाच कलंकीत ठरवण्याच्या वृत्तीमुळे असुरक्षिततेविरोधात “जोहार’ होवू लागलाय की काय, असा सवाल महिला वर्गातून उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment