पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत येत्या 13 आणि 14 एप्रिल रोजी अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन होणार आहे. या संमेलनात महाराष्ट्रातील लोककलांचा आविष्कार, महाराष्ट्राची लोकधारा, विविध विषयांवर परिसंवाद आणि लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची स्मृती जागविणारे कार्यक्रम, असे आकर्षण असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय तिसऱ्या मराठी लोककला स्वागत समिती अध्यक्ष महापौर नितीन काळजे, संमेलनाचे मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप आणि स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.
No comments:
Post a Comment