हायकोर्टाचा निर्णय
25 पेक्षा कमी झाडांसाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक
पुणे- महानगरपालिका आयुक्तांना 25 पेक्षा कमी झाडे तोडण्याविषयीच्या प्रस्तावांबाबत निर्णय घेण्यासाठीही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. तसेच आदेशात त्यांचे अभिप्रायही नोंदवावे लागतील. पालिका आयुक्तांना यापुढे वृक्षतोडीच्या निर्णयाचे स्वतंत्र अधिकार राहणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. अपवाद म्हणून केवळ जीवाला किंवा मालमत्तेला धोका असलेल्या झाडांच्या बाबतीत या निर्णयाला अंतरिम आदेश लागू नसेल. त्याविषयी पालिका आयुक्त आपल्या अधिकारात झाड तोडण्याचा आदेश काढू शकतील आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करता येईल, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment