पिंपरी-चिंचवड शहरात एरिया बेस डेव्हल्पमेंट प्रकल्पाअंतर्गत (एबीडी) सौरऊर्जेची निर्मिती, पालिकेच्या शाळांत ई-लर्निंग आणि पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यास पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्यता देण्यात आली. मंडळाची चौथी सभा सोमवारी (दि.30) आयुक्त दालनात झाली. अध्यक्षस्थानी डॉ. नितीन करीर होते. यावेळी महापौर नितीन काळजे, मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, प्रमोद कुटे, पोलिस अधिकारी अशोक मोराळे, पीसीएससीएलचे आर. पी. सिंग, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी राजेश लांडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment