सरकारकडून घर मिळत नाही... मध्यवर्ती भागात भाड्यानं राहणंही परवडत नाही... ड्यूटीचे तास तर कधीच निश्चित नसतात! मग नोकरीच्या ठिकाणापासून १०-१२ किलोमीटर लांब राहणारा सर्वसामान्य पोलिस लांबलेली ड्यूटी संपल्यावर ठाण्यातल्याच एखाद्या कोपऱ्यात विश्रांती घेण्याचा प्रयत्न करतो..! पुणे शहराची जबाबदारी खांद्यावर असलेल्या जवळपास ७० टक्के पोलिसांना येथे हक्काचे घर नाही आणि त्यातील नऊ हजारांहून अधिक पोलिसांना सरकारी घरही मिळालेले नाही.
No comments:
Post a Comment