अनधिकृत बांधकामांना लावलेला शास्तीकर रद्द करण्याच्या विषयावरून शिवसेना भाजपचेे केवळ राजकारण चालले आहे. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून शास्तीकर माफीचा आदेश काढण्याचे आश्वासन घेऊन परतलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अन शहरवासियांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. दुसरीकडे शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे सांगणार्या व त्यासाठी राज्य शासनाला 15 दिवसांचा अल्टीमेटम देणार्या शिवसेनेला अद्याप आंदोलनासाठी मुहूर्त मिळालेला नाही.

No comments:
Post a Comment