Thursday, 21 June 2018

धोकादायक जाळ्या काढा; पर्यावरणप्रेमींची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने दरवर्षी शहराच्या विविध भागांमध्ये तसेच मुख्य रस्ते, शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांवर वृक्षारोपण केले जाते. वृक्षांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी पिंजरेही लावले जातात. मात्र, एकदा पिंजरे लावले की त्यानंतर त्या वृक्षांकडे लक्ष दिले जात नाही. कालांतराने लावलेली झाडे जस-जशी मोठी होतात. तस-तशी लोखंडी पिंजऱ्याच्या जाळ्या झाडांच्या खोडात रुतलेल्या असतात. त्या जाळ्या झाडांच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहेत. तरी त्या काढण्यात याव्यात अशी पर्यावरण प्रेमींची मागणी आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)

No comments:

Post a Comment