पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 115 कोटी 90 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महापालिका क्षेत्रातील बोर्हाडेवाडी येथे 1288 निवासी सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणार असून त्यासाठी 112 कोटी 18 लाख, भोसरी स.नं.एक मधील दवाखाना इमारतीसाठी बैठक व्यवस्था करणे व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 73 लाख 38 हजार, महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयांचे नेटवर्किंगचे दुरुस्ती व देखभाल कामकाजासाठी एक कोटी 38 लाख 90 हजार या खर्चाचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment