पिंपरी - प्रश्नपत्रिका अपुऱ्या आल्यामुळे, पायाभूत चाचणी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी अनेक शाळांमध्ये दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गोंधळाला सामोरे जावे लागले. विशेषतः सेमी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये ही परिस्थिती उद्भवली. काही शाळांमध्ये प्रश्नपत्रिकेच्या छायांकित प्रती काढून उशिरा परीक्षा सुरू केल्या, तर एक-दोन शाळांवर परीक्षेचा पेपरच पुढे ढकलण्याची वेळ आली.

No comments:
Post a Comment