पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आरक्षित जागेवरून निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने भाजपच्या चार नगरसेवकांची माहिती महापालिकेने राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे पाठवली आहे. त्यामुळे चार नगरसेवकांचे भवितव्य आता राज्य सरकारच्या हाती आहे. राज्य सरकार जे निर्देश देईल, त्यानुसार नगरसेवक पद रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment