Monday, 10 September 2018

शरद पवारांनी हिंजवडीप्रश्‍नी कायमस्वरूपी तोडगा काढावा

नगरसेवक मयुर कलाटे यांनी केली मागणी
हिंजवडी : हिंजवडी येथे आयटी पार्कमध्ये आणि परिसरामध्ये रोजच वाहतूक कोंडी होत असते. पीएमपीएमएलच्या बस, स्थानिक रहिवाश्यांची वाहने, कंपन्यांंच्या गाड्या, कर्मचार्‍यांच्या खासगी गाड्या तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या मोठ्या गाड्या या सर्वांमुळे या वाहतूक कोंडीमध्ये वाढ होते आहे. अनेकदा पोलीस खात्याला निवेदन देऊनही काही उपाय योजना झाली नाही. मात्र नवीन पोलीस आयुक्तालय झाल्यावर आयुक्तांनी चक्राकार वाहतूक सुरू केली आहे. तसेच कर्मचार्‍यांना आणि रहिवाश्यांना या वाहतूक कोंडीवर आपली मते आणि सुचना मागवल्या होत्या. त्यामुळे शरद पवार यांनी या वाहतूक कोंडीवर प्रभावी व दीर्घकालीन तोडगा काढावा, अशी मागणी नगरसेवक मयुर कलाटे व शिष्टमंंळाने निवेदनाद्वारे केली. यावेळी हिंजवडी ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सरपंच सागर साखरे, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे आपली मागणी केली.

No comments:

Post a Comment