पिंपरी– पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्यानंतर सुधारित आकृतीबंधानुसार अद्यापही नोकर भरती झालेली नाही. प्रत्येक विभागात मनुष्यवळाचा तुटवडा जाणवत असून, विविध विभागांकडून होणाऱ्या मागणीनुसार कर्मचारी पुरविताना प्रशासन विभागाची दमछाक होत आहे. ही बाब लक्षात घेत, महापालिका प्रशासनाने विविध 311 संवर्गातील एकूण 2, 763 पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला “ग्रीन सिग्नल’ मिळताच ही पदे भरली जाणार आहेत.

No comments:
Post a Comment