Friday, 2 November 2018

जलसंपदा विभागाला 45 कोटींचा पहिला हप्ता

पिंपरी- गेली दहा वर्षांपासून रखडलेल्या आंद्र आणि भामा आसखेड धरणातील आरक्षित पाणी देताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने 239 कोटी सिंचन पुनर्स्थापना खर्च देण्याची मागणी केली होती. महापालिका प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त करूनही हा खर्च माफ करण्यास जलसंपदा विभागाने नकार दिल्याने आता उशिरा शहाणे झालेले महापालिका प्रशासन सिंचन पुनर्स्थापनेचा पहिला हप्ता देण्यास राजी झाले आहे. गुरुवारी झालेल्या महासभेत 45 कोटींचा पहिला हप्ता देण्यास उपसूचनेसह मंजुरी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment