पुणे - पीएमपीच्या ताफ्यात नव्या ४२५ वातानुकूलित (एसी) बस २६ जानेवारीपर्यंत दाखल होणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच सध्याच्याच भाडेदरात ‘एसी’ बस प्रवाशांना उपलब्ध होणार असल्यामुळे शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील प्रवाशांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळणार आहे. नव्या बसमधील २५ ई-इलेट्रिक, तर ४०० बस या सीएनजीवर धावणाऱ्या असतील.


No comments:
Post a Comment