पुणे : सरकारने नोटाबंदी, महारेरा आणि जीएसटी अशा एकापाठोपाठ घेतलेल्या निर्णयामुळे घर व जमीन खरेदी-विक्रीत चढ-उतार निर्माण झाला होता. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात घर, जमीन खरेदीच्या दस्त नोंदणीत सातत्याने चांगली वाढ होत आहे. तसेच दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी-विक्री व्यवसायात तेजी आहे. या आर्थिक उलाढालीमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये आश्वासक चित्र निर्माण झाले असून बांधकाम क्षेत्रातील अनिश्चितता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे.
No comments:
Post a Comment