Friday, 14 December 2018

पिंपळे सौदागर येथील स्मशानभूमीच्या कामाची महापौरांकडून पाहणी

चौफेर न्यूज –  पिंपळे सौदागर येथे स्मशान भूमीच्या कामाची महापौर राहुल जाधव व नगरसेवक नाना काटे यांनी पाहणी केली. ही स्मशानभूमी बांधण्यासाठी महापालिकेने दि.१६ सप्टेंबर २०११ रोजी मंजुरी दिली. ३ जानेवारी २०१२ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. या स्मशानभूमीच्या कामात अम्फीथीएटर, दशक्रिया विधी हॉल, पिंडदान व्यवस्था, ८० मीटर लांब व ८ मीटर रुंद घाट, स्वच्छता गृह, पार्किंग, वाचमन रूम, कंपाउंड वाल, गेट, कमान आदी कामाचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी विद्युत दाहिनी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा ठेवलेली आहे. या कामापैकी मागील भिंत आणि कमानीचे काम व इतर अनुषंगिक काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव आणि नगरसेवक नाना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

No comments:

Post a Comment