नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली.
२७६ सदनिका असलेल्या या सोसायटीत रोज एक टन कचरा संकलित केला जातो. त्याचे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा वीस बाय चार फुटांच्या हौदात एकत्र केला. नगरसेवक नाना काटे, शीतल काटे यांनी सेंद्रिय पदार्थांचे
विघटन करणारे जिवाणू हौदात टाकून या प्रकल्पाचे उद्घाटन केले. या वेळी सचिव रूपेश भंडारे, जयदेव दवे, विवेक महाजन, आनंद कुर्तडीकर, वेंकट शंकर, श्वेताभ कुमार यांच्यासह कुणाल आयकॉनचे अध्यक्ष विनोद सुर्वे, पंकज भाकरे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment