Saturday, 21 September 2019

इंद्रायणीमाईचे विधीवत जलपूजन, भोसरीतील पुलाखाली अर्बन स्ट्रीटच्या कामाचे भूमिपूजन

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारे इंद्रायणी नदीचे पात्र आता स्वच्छ आणि प्रदूषणविरहित राहणार आहे. सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात जाऊ नये यासाठी महापालिकेमार्फत नदीच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. इंद्रायणीमाईचे विधीवत जलपूजन करुन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच भोसरीतील उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीटनुसार विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले.

भोसरीत मतदारसंघातील गायरानाचा प्रश्न निकालात, 300 कोटीची विविध गावातील गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित

समाविष्ट गावात होणार विकासकामांचा धडाका; आमदार महेश लांडगे यांची माहिती

पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांची महाविद्यालये प्राधिकरणाच्या भूखंडावर होण्याचा मार्ग मोकळा 

प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक नऊ येथील पाच भूखंड शैक्षणिक संस्थाना देणार;आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश  

Pune: Sandeep Bishnoi appointed Pimpri Chinchwad police chief

[Video नमामि इंद्रायणी' नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन


‘वायसीएम’मध्ये अधिष्ठाता, प्राध्यापकांची 71 पदे भरणार

‘वायसीएम’मध्ये अधिष्ठाता, प्राध्यापकांची 71 पदे भरणार

भोसरीतील विजेचा लंपडाव संपणार, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरु

धोकादायक ट्रान्सफॉर्मर हटविले, आमदार महेश लांडगे यांची माहिती
पिंपरी :- पिंपरी महापालिकेत समाविष्ट झालेल्या भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावातील विजेचा लपंडाव संपणार आहे. चऱ्होली, वडमुखवाडी, मोशीसह भोसरी मतदारसंघात आवश्यकतेनुसार महावितरणने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत होणार नाही. तसेच धोकादायक ट्रान्सफॉर्मर महावितरणे हटवल्यामुळे संभाव्य धोका टाळला आहे. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

Pimpri : महापालिका तीन नव्हे दोन डस्टबीन देणार; डस्ट बीन्सची खरेदी सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक सदनिकांसाठी दोन डस्ट बीन (कचरा पेटी) देण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेने डस्ट बीनची खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी 30 कोटी रुपये खर्च येणार आहे. दरम्यान, प्रशासनाने तीन डस्टबीन खरेदी करण्याचे नियोजित केले होते. परंतु, टीकेचा भडीमार झाल्यानंतर दोनच डस्टबीन देण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 22 […]

Pimpri : महापालिकेच्या भंगार साहित्याचा होणार लिलाव, महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भंगार साहित्याचा लिलाव केला जाणार आहे. याबाबतच्या उपसूचनेला शुक्रवारी (दि. 20) महासभेने मान्यता दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे टाटा एस वाहनांचे लोडबॉडी भंगार साहित्य जमा झाले होते. या साहित्याचे ए. व्ही. शेवडे अ‍ॅण्ड असोसिएटस् यांच्याकडून मूल्यांकन करुन घेण्यात आले. चालू बाजारभावानुसार त्याचे 23 लाख 62 हजार 500 रुपये मूल्यांकन करण्यात आले […]

पंतप्रधान मोदींचे प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्य, त्यांचा प्रत्येकाला अभिमान – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी – पंतप्रधान नरेंद  मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या देशाचा दबदबा निर्माण केला आहे. ते देशातील गोरगरीब जनतेसाठी अविरतपणे कार्य करीत आहेत. देशातील प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा देशातील प्रत्येकाला अभिमान असल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी (दि. १७) सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रभावक्षेत्र- पुणे जिल्ह्य़ात युतीचे प्राबल्य

पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघांवर आता भाजपचा प्रभाव आहे.

टाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद

टाटा मोटर्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून ‘ब्लॉक क्लोजर’ चे पर्व सुरूच आहे.

पिंपरी चिंचवड शहरात ‘मोरया युथ फेस्टिव्हल’

युवकांमध्ये शारिरीकमानसिक बळ वाढविणारा आणि युवा पिढीला व्यसनांपासून दूर करणार उपक्रम
ॲड. सचिन पटवर्धन यांची माहिती
पिंपरी :- पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रिडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी मोरया युथ फेस्टिव्हलचे यशस्वी आयोजन मागील वर्षी करण्यात आले होते. यावर्षी देखील ‘मोरया युथ फेस्टिव्हल २०२०’ चे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरसेवक बाबू नायर, माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी, कामगार नेते इरफान सय्यद, किरण येवलेकर, राजेश पाटील आदी उपस्थित होते.

पिंपळे सौदागरमध्ये ‘थ्रीडी वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

राहुल कलाटे आयोजित उपक्रमात ७ हजार नागरिकांचा सहभाग
पिंपरी :- पिंपळे सौदागरमध्ये शिवसेना गटनेते राहुल कलाटे आयोजित ‘थ्रीडी वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मधुमेह मुक्तीच्या प्रसारासाठी तसेच स्वस्थ आणि निरोगी आरोग्यासाठी काढलेल्या पाच किलोमीटरच्या या वॉकेथॉनमध्ये तब्बल ७ हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. डॉ.दीक्षित डाएटचे उद्गाते सो. श्रीकांत जिसकर यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते या वॉकेथॉनचे उद्घाटन झाले.