पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारे इंद्रायणी नदीचे पात्र आता स्वच्छ आणि प्रदूषणविरहित राहणार आहे. सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात जाऊ नये यासाठी महापालिकेमार्फत नदीच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. इंद्रायणीमाईचे विधीवत जलपूजन करुन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच भोसरीतील उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीटनुसार विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment