Sunday, 19 April 2020

गरजूंना वाटपासाठी प्रत्येक नगरसेवकाला 5 लाखाचे धान्य खरेदी करून द्यावे

महापौर उषा ढोरे यांची आयुक्तांना सूचना
पिंपरी (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणारे कामगार, गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या प्रभागात धान्य वाटप करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे धान्य खरेदी करून वाटपासाठी देण्यात यावे. तसा प्रस्ताव नजीकच्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवावा, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment