नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने सर्व सरकारी व खासगी कर्मचार्यांना आरोग्य सेतु अॅप वापरणे बंधनकारक केले आहे. हे अॅप कॉविड -19 विरुद्ध लढण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे सर्व लोक त्यांच्या फोनवर आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करतील याची खात्री करण्यासाठी गृह मंत्रालयाने स्थानिक प्राधिकरणाला सांगितले आहे. सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविला आहे. यासोबतच प्रत्येकाने त्यांच्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment