पिंपरी (प्रतिनिधी) – गोरगरिबांना शासन अन्नधान्य व रेशन देत आहे. श्रीमंतांकडे मुबलक पैसे असल्याने ते लॉकडाऊनच्या काळात आरामात जगत आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये मध्यमर्गीयांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. पगार मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. मध्यमवर्गियांच्या समस्येला पिंपळे गुरवमधील एका महिलेने वाचा फोडत खासदार, आमदार आणि नगरसेवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाब विचारला. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. सांगवी पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढत तिला मदत मिळवून दिली. तसेच सोशल मीडियावरील व्हिडिओबाबत तिला नोटीसही बजावली.
No comments:
Post a Comment