Wednesday, 13 May 2020

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’च्या कामकाजाचे कौतुक

पिंपरी:  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या  ‘कोविड १९ वॉर रुम’ ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. तसेच येथून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना यावेळी सूचना केल्या. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय तसेच महापालिकेतील संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment