नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सोमवारी देशात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढून 42836 वर पोहोचली आहे. तसेच, देशात आतापर्यंत 1389 लोकांचा मृत्यू झाला आहे. देश आणि जगात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका पाहता लस, औषध आणि इतर आवश्यक उपकरणे वैज्ञानिक स्तरावर तयार करण्याचे काम चालू आहे. दरम्यान, भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) एक खास उपकरण बनवल्याचा दावा केला आहे. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार यूव्ही (अल्ट्राव्हायोलेट) ब्लास्टर नावाचा यूव्ही ब्लास्टर टॉवर (UV blaster tower) तयार करण्यात यश मिळाले आहे. या मशीनमध्ये 12 x 12 ची खोली 10 मिनिटांत विषाणूमुक्त करण्याची क्षमता आहे.
No comments:
Post a Comment