Wednesday, 19 September 2012

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होणार

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होणार
पिंपरी, 18 सप्टेंबर
महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयावरील ताण लक्षात घेऊन आता महापालिकेच्या शहरातील इतर सात रूग्णालयांचेही सक्षमीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, या रूग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेच्या तालेरा, आकुर्डी, जिजामाता आणि भोसरी रूग्णालयात गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार तातडीक विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीही तातडीक वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) नेमण्यात येणार आहेत. नियुक्त करण्यात येणा-या वैद्यकीय अधिका-यांना त्यांच्या अनुभवानुसार वेतन देण्यात येणार आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


राष्ट्रवादीच्या पुढा-यांनी ताळतंत्र सोडू नये - बाबर

राष्ट्रवादीच्या पुढा-यांनी ताळतंत्र सोडू नये - बाबर
पिंपरी, 18 सप्टेंबर
शिवसेनेला कोणी दादागिरीची भाषा शिकवू नये. रस्त्यावरील लढायांपासून ते सभागृहातील आंदोलनापर्यंतची सर्व शस्त्र शिवसेनेच्या भात्यात आहेत. जर कोणी अरे म्हटले तर आम्ही कारे म्हणणा-यांपैकी आहोत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पुढा-यांनी, लोकप्रतिनिधींनी ताळतंत्र सोडू नये. जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी दिला. शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांना राष्ट्रवादी नगरसेवकाने दिलेली धमकीचा संदर्भ मुंबई उच्च न्यायालयात देऊ, असेही ते म्हणाले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


हजारो बेकायदा बांधकामांना 'बाप्पा' पावणार ; दंड आकारुन बांधकामे नियमित होणार

हजारो बेकायदा बांधकामांना 'बाप्पा' पावणार ; दंड आकारुन बांधकामे नियमित होणार
पिंपरी, 18 सप्टेंबर
महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईमुळे भयभीत झालेल्या शहरवासियांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केला आहे. त्यानुसार सामासिक अंतरामध्ये 20 टक्क्यांपर्यंत केलेली वाढीव आणि दहा टक्क्यांपर्यंत जादा एफएसआय वापरुन करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनुज्ञेय होत असल्यास टीडीआर आणि डी.पी. रस्त्याने बाधित क्षेत्राच्या निर्देशांकाचा वापर करण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यासाठी एकूण बांधकाम क्षेत्राच्या 35 टक्के दंड आकारला जाणार असून मार्च 2012 पूर्वीच्याच अवैध बांधकामांनाच त्याचा लाभ होईल. या नवीन धोरणानुसार सुमारे 30 हजार अनधिकृत बांधकामधारकांना 'बाप्पा' पावणार आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आयुक्तांचा नवा फॉर्म्युला

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आयुक्तांचा नवा फॉर्म्युला
पिंपरी, 18 सप्टेंबर
अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नवा फॉर्म्युला तयार केला असून या द्वारे सामासिक अंतरामध्ये 20 टक्क्यांपर्यंत फरकाने केलेले बांधकाम, मंजूर चटईक्षेत्र निर्देशांकापेक्षा 10 टक्क्यांपर्यंत जादा बांधकाम अशा वाढीव बांधकामाच्या खर्चाच्या 35 टक्के दंडाचा प्रस्तावीचू घोषणा आयुक्तांनी आज पत्रकार परिषदेत केली. या प्रस्तावामुळे बेकायदा बांधकाम करणा-यांना पिंपरी-चिंचवड पालिकेकडून दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

भंगार व्यावसायिकाचा भोसरीत निर्घृण खून

भंगार व्यावसायिकाचा भोसरीत निर्घृण खून
पिंपरी, 18 सप्टेंबर
दुकानात चाललेल्या भंगार व्यावसायिकाची मोटार अडवून तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी कोयता, सत्तूर व तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी 40 हून अधिक वार करून निर्घृण खून केला. भोसरीच्या महात्मा फुलेनगर भागात काल (सोमवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. भावकीच्या वादातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सावळे आणि साबळे यांच्यात जोरदार खडाजंगी

सावळे आणि साबळे यांच्यात जोरदार खडाजंगी
पिंपरी, 17 सप्टेंबर
लिंक रस्ता पत्राशेड या अघोषित झोपडपट्टीचे पुनर्वसन करताना महापालिकेने कायदेकानू धाब्यावर बसविल्याचे निवेदन शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी आयुक्तांकडे सादर केल्याची माहिती मिळताच माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या रहिवाश्यांनी महापालिका भवनात येऊन गोंधळ घातला. नगरसेविका सावळे यांना घेराव घालत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सावळे आणि साबळे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यावरुन निर्माण झालेला तणाव पोलिसांच्या मध्यस्थीनंतर निवळला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


Tuesday, 18 September 2012

'सिटी सेंटर'साठी महापालिका लावणार 350 कोटींची बोली

'सिटी सेंटर'साठी महापालिका लावणार 350 कोटींची बोली
पिंपरी, 17 सप्टेंबर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर महापालिकेने सिटी सेंटरसाठी अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या वेळी सिटी सेंटरसाठी विकसकाकडून किमान 350 कोटी रुपयांची बोली अपेक्षित धरण्यात आली आहे. मागील चुका दुरुस्त करुन लवकरच याबाबतचा फेरप्रस्ताव तयार केला जाणार आहे. महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत नियोजित सिटी सेंटर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in