Wednesday, 28 November 2012

महापालिका सभेत आयुक्त 'टार्गेट' ; विकास कामे खोळंबल्याचा आरोप

महापालिका सभेत आयुक्त 'टार्गेट' ; विकास कामे खोळंबल्याचा आरोप
पिंपरी, 27 नोव्हेंबर
निवडणुका होवून नऊ महिने उलटूनही विकास कामे होत नसल्याचा आरोप करत 'अमेरिका रिटर्न' आयुक्त डॉ . श्रीकर परदेशी यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज (मंगळवारी) झालेल्या महापालिका सभेत 'टार्गेट' केले. आयुक्तांनी अवैध बांधकाम पाडापाडीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे शहरविकास खोळंबला आहे. आयुक्त केवळ बैठका, चर्चांमध्ये मग्न असून आयुक्तांच्या कार्यपध्दतीमुळे अधिकारी राजीनामे देत आहेत, रजेवर जात आहेत, अशी घणाघाती टीकाही करण्यात आली.
www.mypimprichinchwad.com

भारतकेसरी विजय गावडेचे जल्लोषात स्वागत

भारतकेसरी विजय गावडेचे जल्लोषात स्वागत
पिंपरी, 27 नोव्हेंबर

भारतकेसरी विजय गावडे याचे आज सायंकाळी लोहगाव येथील विमानतळावर आगमन झाले त्यावेळी त्याचे पिंपरी-चिंचवडमधील कुस्तीप्रेमींनी उत्साहात स्वागत केले.
www.mypimprichinchwad.com

पिंपरी-चिंचवड शहरातील उद्यानांची सफर महागली !

पिंपरी-चिंचवड शहरातील उद्यानांची सफर महागली !
पिंपरी, 27 नोव्हेंबर
शहरातील मोठ्या उद्यानांच्या प्रवेश शुल्कात पाचपटीने वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये घेण्यात आला. त्यामुळे लहान मुलांना एक रुपयांऐवजी पाच तर प्रौढांना दोन रुपयांऐवजी दहा रुपये मोजावे लागणार आहेत. याखेरीज उद्यानांमध्ये चित्रीकरणासाठी असलेले दर अडीच पटीने वाढविण्यात आले आहेत.
www.mypimprichinchwad.com

नारदीय कीर्तन परंपरा जोपासण्यासाठी उच्चशिक्षित उत्सुक

नारदीय कीर्तन परंपरा जोपासण्यासाठी उच्चशिक्षित उत्सुक
पिंपरी, 27 नोव्हेंबर

नारदीय कीर्तन परंपरेतून गेल्या अनेक वर्षांपासून समाजप्रबोधन केले जात आहे. या कीर्तनाच्या उत्तररंगात क्रांतीकारक व समाजसुधारकांच्या विचारांचे आणि चरित्राचे तात्विक विवेचन करण्यात येते. त्यामुळे समाजप्रबोधनाचे हे एक फार मोठे माध्यम म्हणून ओळखले जाते. ही परंपरा खंडीत होते की काय अशी शंका वाटत असतानाच ही कला शिकून घेण्यासाठी समाजातील सर्वच घटकातील लोक उत्सुक आहेत
चिंचवड देवस्थान ट्रस्ट व विश्व हिंदु परिषदेने नारदीय कीर्तन परंपरेला पुढे सुरु ठेवण्यासाठी दहा दिवसांचे निवासी नारदीय कीर्तन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. यामध्ये डॉक्टर, अभियंते बँकींग व्यवसायातील लोक नारदीय कीर्तनाचे प्रशिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे.
www.mypimprichinchwad.com

रावेत पुलावरून गॅस टँकर नदीपात्रात कोसळला

रावेत पुलावरून गॅस टँकर नदीपात्रात कोसळला
पिंपरी, 27 नोव्हेंबर

रावेत पुलाचा कठडा तोडून 25 ते 30 फुटावरून भारतगॅस कंपनीचा एलपीजी गॅस टँकर पवना नदीपात्रातील जमिनीवर कोसळल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या टँकरमध्ये गॅस नव्हता. या घटनेत चालक आणि क्लिनर जखमी झाले असून त्यांना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tuesday, 27 November 2012

सर्वसाधारण सभेवरील नियंत्रण सुटल्याने महापौर हतबल

सर्वसाधारण सभेवरील नियंत्रण सुटल्याने महापौर हतबल:
तब्बल १८० कोटींचा आर्थिक फटका देणाऱ्या जकात समानीकरणाच्या बहुचर्चित प्रस्तावावरून सोमवारी पिंपरी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची छुपी दुकानदारी असल्याची चर्चा असलेल्या या प्रस्तावावर बोलू न दिल्याने संतापलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभेचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीच्या अनुभवी नगरसेवकांनी या गोंधळातच विषयपत्रिकेवरील २८ प्रस्ताव काही मिनिटांत मार्गी लावले. या गोंधळात महापौरांचे सभेवरील नियंत्रण सुटल्याचे दिसून आले.
पिंपरी पालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने जकात विभागाच्या १८ वस्तूंचे दर समान ठेवण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावामुळे पालिकेचे नुकसान होणार असल्याची बाब काही सदस्यांनी महापौर व आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच जकातीचे दर वाढवण्यास सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोधही दर्शविली. चर्चेचा समारोप करताना राष्ट्रवादीकडून योगेश बहल यांनी मांडलेली उपसूचना व समानीकरणाचा प्रस्ताव महापौरांनी मंजूर केला. तथापि, उपसूचनेवर आम्हाला बोलायचे आहे, असे सांगत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मात्र, मंजूर झालेल्या विषयावर बोलता येणार नाही, असे सांगत महापौरांनी पुढील विषय वाचण्याचे आदेश दिले. त्यामुळे सेनेचे नगरसेवक संतापले व त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. बाबासाहेब धुमाळ, श्रीरंग बारणे, सुलभा उबाळे, सीमा सावळे यांच्यासह सेनेचे नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर आले. त्यांनी महापौर व राष्ट्रवादीच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात घोषणा सुरू केल्या. त्यामुळे सभागृहात कमालीचे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महापौर शिवसेना नगरसेवकांना बोलू देत नव्हत्या. तर, बोलू न दिल्यास सभा बंद पाडू, असा पवित्रा सेना नगरसेवकांनी घेतला. गोंधळामुळे महापौरांना काही सुचत नव्हते. क्षणात एक आदेश देऊन दुसऱ्या क्षणी त्या भलतेच सांगत होत्या. दुसरीकडून मंगला कदम, शमीम पठाण, नारायण बहिरवाडे, जितेंद्र ननावरे आदींनी विषय घाईने वाचण्याचा सपाटा लावला होता. हे विषय मंजूर झाल्याचे महापौरांनी घोषित करणे अपेक्षित होते.
शिवसेना नगरसेवकांच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक सरसावल्याने गोंधळात भर पडली. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात २८ विषयांचे कामकाज संपवण्यात आले. त्यात अनेक महत्त्वाचे विषय होते. मात्र, त्यापैकी मंजूर कोणते, तहकूब कोणते, कोणत्या विषयावर कुठली उपसूचना दिली, याचा कुणालाही मेळ नव्हता. अखेर, गोंधळातच सभेचे कामकाज संपल्याचे महापौरांनी जाहीर केले. सभेनंतरही सेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या धिक्काराच्या घोषणा सुरूच ठेवल्या होत्या.  

PCMC okays octroi rationalisation

PCMC okays octroi rationalisation: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) approved a resolution to rationalise octroi rates in the township at its general body meeting held on Monday.