Tuesday, 25 June 2013

सर्व रोगनिदान शिबिराचा २00 जणांना लाभ

सर्व रोगनिदान शिबिराचा २00 जणांना लाभ: पिंपरी : रविवारी महात्मा फुलेनगर येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच व चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचा २00 नागरिकांनी लाभ घेतला.

वटसावित्री पौर्णिमेचा सण असताना देखील महिलांची संख्या जास्त होती. शिबिरात डॉ. प्रशांत महाजन, डॉ. किरण भिसे, डॉ. शीतल मोहिते, डॉ. नीलेश अगवेकर, तसेच त्यांचे सहकारी यांनी योगदान दिले. शिबिराचे उद्घाटन नगरसेवक अजय सायकर व निर्भया नारी ब्रिगेडच्या अध्यक्षा मनीषा गटकळ यांनी केले. शिबिरात सुलभा उबाळे, सचिन सानप, अशोक होले, प्रशांत जाधव, देवराम मेदनकर, अँड संपत भुजबळ या मान्यवरांनी भेट देऊन सहकार्य केले.

संघटना हा समाजाचा चेहरा : आव्हाड

संघटना हा समाजाचा चेहरा : आव्हाड: पिंपरी : सामाजिक संघटना हा त्या समाजाचा एक चेहरा असून, संघटनामुळे समाजातील एकोपा टिकून राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन अँड. भास्करराव आव्हाड यांनी येथे केले.

भगवान सेना पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झाले. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. आव्हाड बोलत होते. शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे यांच्या हस्ते झाले .पुण्यातील नगरसेवक दत्ता खाडे, सेना शहराध्यक्ष सुभाष दराडे, प्रदेश उपाध्यक्ष बबन जायभाय, व्यंकटेश भताने, राहुल नागरगोजे, आदिनाथ माळवे, जयप्रकाश दहिफळे, शांतीलाल दहिफळे, अरुण गिते, उपस्थित होते.

जयसिंग पोवार यांना राजर्षी शाहू पुरस्कार

जयसिंग पोवार यांना राजर्षी शाहू पुरस्कार: पिंपरी : राजर्षी शाहूमहाराज जयंतीनिमित्त २५ व २६ जूनला महापालिका व कोल्हापूर मित्र मंडळाच्या वतीने सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कामगारनेते जयसिंग पोवार यांना शाहूमहाराज पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस पक्षनेत्या मंगला कदम, कोल्हापूर मित्र मंडळाचे संभाजी पार्टे, विधी समिती सभापती वैशाली जवळकर उपस्थित होत्या. मंगळवारी २५ जूनला सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उच्च न्यायालयाचे वरिष्ठ समन्वयक अँड. संभाजी मोहिते यांचे ‘राजर्षी शाहू -राजा आणि माणूस’ या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी ७ ला ‘जयजय महाराष्ट्र माझा’ हा कार्यक्रम होणार आहे.

राज्यस्तरीय गजल कार्यशाळा ३0 जूनला

राज्यस्तरीय गजल कार्यशाळा ३0 जूनला: पिंपरी : नवोदित साहित्यिक व गजलकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशनच्या वतीने रविवार, दि. ३0 जूनला सकाळी १0 ते सायंकाळी ८ पर्यंत तारांगण हॉल, निगडी प्राधिकरण येथे राज्यस्तरीय एकदिवसीय गजल कार्यशाळा, मुशायरा व गजल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

गजल गंधर्व सुधाकर कदम (पुणे), ज्येष्ठ गजलकार कलीमखान (यवतमाळ), गजल गायिका रेणू कदम चव्हाण (कानपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत वरील कार्यक्रम होईल. कार्यशाळेकरिता राज्यातील शब्द परिवारातील नामवंत गजलकार उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक संजल सिंगलवार व प्रभाकर वानखडे यांनी दिली.

पालिका गणेशोत्सव स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण

पालिका गणेशोत्सव स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण: पिंपरी : महापालिका आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २0१२ चा पारितोषिक वितरण समारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात बुधवारी, दि. २६ रोजी दुपारी ३ ला आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी दिली.

विजेत्या गणेशोत्सव मंडळांना प्रशस्तिपत्रक व धनादेशाचे वाटप महापौरांच्या हस्ते होईल. कार्यक्रमास खासदार गजानन बाबर, शिवाजीराव आढळराव पाटील, सुप्रिया सुळे, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, आयुक्त श्रीकर परदेशी, उपमहापौर शरद मिसाळ, स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप, पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते कैलास कदम, क्रीडा समिती सभापती रामदास बोकड, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी लोंढे, शहर सुधारणा समिती सभापती आशा सुपे, विधी समिती सभापती वैशाली जवळकर उपस्थित राहणार आहेत.

आठ महिन्यांत 5500 फलकांवर कारवाई

आठ महिन्यांत 5500 फलकांवर कारवाई

पिंपरी -&nbsp महापालिकेने गेल्या आठ महिन्यांत पाच हजार 610 अनधिकृत फलकांवर कारवाई करीत एक लाख 85 हजार 670 रुपयांचा दंड वसूल केला, तर 79 हजार 450 रुपयांचे प्रशुल्क वसूल केल्याची माहिती आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहायक आयुक्‍त सतीश कुलकर्णी यांनी दिली.

'एलबीटी'साठी महापालिका चार लाख एसएमएस पाठविणार

'एलबीटी'साठी महापालिका चार लाख एसएमएस पाठविणार

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) जनजागृती करण्यासाठी शहरातील व्यापारी आणि नागरिकांना तब्बल चार लाख एसएमएस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.