Monday, 1 July 2013

रेडझोन रद्द करण्यासाठी स्वाक्षरी ...

रेडझोन रद्द करण्यासाठी स्वाक्षरी ...:
वारक-यांचा उदंड प्रतिसाद
लष्कराने लागू केलेला रेडझोनमध्ये देहू, टाळगाव-चिखली, आळंदी, लोहगाव या सर्व तीर्थक्षेत्रांचा समावेश झालेला आहे. त्याचबरोबर जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मार्ग देखील रेडझोनमध्ये येत आहे. 

वारीतील ट्रकची धडक बसून दुचाकीवरील ...

वारीतील ट्रकची धडक बसून दुचाकीवरील ...:
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहुरोड येथील शस्त्रास्त्र निर्मिर्ती कारखान्या समोर पालखीतील दिंडीचे साहित्य वाहून नेणा-या ट्रक व मोटारसायकल यांची धडक होऊन झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाली.

तीन दुचाकी चोर गजाआड

तीन दुचाकी चोर गजाआड:
निगडी, पिंपरी, चिंचवड आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बनावट चावीचा वापर करुन दुचाकी चोरणारी टोळी निगडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

थेट गॅस बुकिंग आजपासून बंद

थेट गॅस बुकिंग आजपासून बंद: थेट वितरकांकडे जाऊन किंवा फोन करून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे बुकिंग करण्याची पद्धत आजपासून (सोमवार) बंद होत आहे. यापुढे 'इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम'द्वारेच (आयव्हीआरएस) सिलिंडरसाठी नोंदणी करता येणार आहे.

पिंपरीत ‘वादग्रस्त’ प्रस्ताव राष्ट्रवादीने रेटले; ‘लाभार्थी’ विरोधकांचे मौन

पिंपरीत ‘वादग्रस्त’ प्रस्ताव राष्ट्रवादीने रेटले; ‘लाभार्थी’ विरोधकांचे मौन: पिंपरी पालिकेच्या सभेतील ‘वादग्रस्त’ प्रस्ताव उपसूचना घुसवून बिनबोभाट मंजूर करण्याची किमया सत्ताधाऱ्यांनी अखेर साधलीच.

राजकारण ठेवा बाजूला; अडीच एफएसआय द्या पीएमपीला

राजकारण ठेवा बाजूला; अडीच एफएसआय द्या पीएमपीला

राजकारण ठेवा बाजूला; अडीच एफएसआय द्या पीएमपीलापुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांची वाहतुकीच्या समस्येतून सुटका करायची असेल, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (पीएमपीएमएल) सक्षम करायला हवे, याबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाचे दुमत नाही.

Sunday, 30 June 2013

विकास प्रकल्पांसाठी 223 एकर जागा ...

विकास प्रकल्पांसाठी 223 एकर जागा ...:
विकास प्रकल्पांसाठी 223 एकर जागा गमाविलेल्या नगरसेवकाची व्यथा !
पहिला औद्योगिक झोन..., त्यानंतर औद्योगिक भूखंडाच्या निवासीकरणाला परवानगी... त्यावर लादला गेलेला बीआरटीएस कॉरीडॉर...त्यावर पुन्हा मेट्रो स्टेशन...अशा एकाच जागेवर वारंवार बदलले गेलेले आरक्षण...त्यामुळे बदलेली नियमावली...या सर्व द्राविडीप्राणायामात भोगाव्या लागलेल्या यातनांमुळे व्यथित
Read more...