Friday, 12 July 2013

महापालिकेच्या वृक्षारोपण पंधरवड्याला आजपासून (गुरुवार) दणक्यात सुरुवात झाली

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण पंधरवड्याला आजपासून (गुरुवार) दणक्यात सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरीक, महिला बचतगटांच्या सहभागातून चारही प्रभागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

शिवसेनेची शुक्रवारी आढावा बैठक

शिवसेना चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिका-यांची बैठक शनिवारी (दि. 13) दुपारी तीन वाजता आकुर्डीतील शिवसेना भवन येथे होणार आहे. या बैठकीस पुणे, मावळ लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख आमदार डॉ.नीलम गो-हे मार्गदर्शन करणार आहेत.

अवैध बांधकामांचा दररोज अहवाल द्या

आयुक्तांचे बीट निरीक्षकांना आदेश 
अनधिकृत बांधकामे फोफावण्यास बीट निरीक्षकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज बैठक घेत बीट निरीक्षकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करुन

पिंपरीत महापौर, अतिरिक्त आयुक्तांसह तीन अभियंत्यांसाठी आलिशान मोटारी

महापौर मोहिनी लांडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्यासह तीन अभियंत्यांनाही नव्याने मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत.

पिंपरी पालिकेची प्रभाग कार्यालये यापुढे होणार ‘क्षेत्रीय कार्यालये’

सध्याच्या चार प्रभागांमध्ये आणखी दोनची भर पडणार आहे. पुणे महापालिकेप्रमाणेच ‘क्षेत्रीय कार्यालय’ असे त्यांचे नामकरण राहणार आहे.

पिंपरी पोलिस ठाण्यात मधुमेह चाचणी शिबिर

पिंपरी- ताण-तणावाखाली काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विप्रो इंडिया कॉर्पोरेशनच्या वतीने पिंपरी पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मधुमेह चाचणी शिबिरात 67 अधिकारी-कर्मचाऱ्यांची बुधवारी (ता.

मोफत मधुमेह तपासणी शिबिर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 14)  चिंचवड येथे मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस अक्रम शेख यांनी दिली.