Wednesday, 21 August 2013

नागरी ई-गव्हर्नन्ससाठी राज्यस्तरीय पोर्टल आवश्यक - डॉ. करीर

ई-गव्हर्नन्स ही काळाची गरज आहे, नागरी ई-गव्हर्नन्स बाबतचे राज्यस्तरीय पोर्टल निर्माण करण्याची आवश्यकता असून त्यासाठी नियम आणि पध्दती मध्ये समानता असायला हवी, असे मत राज्याचे विक्रीकर आयुक्त डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सवासाठी महावितरणची अधिकृत जोडणी सुविधा

अनधिकृत वीज जोडणीमुळे होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले असून या जोडणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

'जेरी' व 'तारा'ची रवानगी कात्रज उद्यानात


बहिणाबाई उद्यान झाले सुनसुने
केंद्र सरकारच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उद्यानातील 'जेरी' व 'तारा' या बिबट्याच्या नर व मादीला आज सकाळी कात्रज उद्यानात हलविण्यात आले. त्यामुळे बहिणाबाई उद्यान सुनसुने झाले

नाशिकफाटा उड्डाणपुलावर लखलखणार 62 लाखांचे दिवे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिकफाटा येथे उभारण्यात येणा-या दुमजली उड्डाणपुलाच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी उड्डाणपुलावर आकर्षक एल.ई.डी. दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल 62 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.

'महिंद्रा'चा चाकण प्रकल्प आणखी 7 दिवस बंद राहणार

मंदीमुळे बाजारपेठेत वाहनांना मागणी नसल्याने महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड या कंपनीने चाकण प्रकल्प आणखी सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनउद्योग क्षेत्रातील मंदीचा मोठा परिणाम कंपनीच्या वाहनविक्रीवर झाला असून त्याचाच परिणाम गेल्याच महिन्यात

चार तिकीट तपासनिसांना देहूरोड येथे ट्रकने ठोकरले

भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पीएपीच्या चार तिकीट तपासनिसांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देहूरोड फाटा येथे रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.

महापालिका सुरू करणार फेसबुक अकाउंट


- मोबाइल अँप्सचा अवलंब : ई-ऑफिस नवे सॉफ्टवेअर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १0 विभागांच्या ई-ऑफिसचे काम पहिल्या टप्प्यात करणार असून, येत्या २ सप्टेंबरपासून पिंपरी चिंचवड महापालिकेचे फेसबुक अकाउंट सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले. तसेच जानेवारी २0१४ पयर्ंत ई-ऑफिसचे सॉफ्टवेअर तयार होणार असल्याची माहितीही आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.महापालिकेच्या वतीने यशदा पुणे येथे माहिती तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या अर्बन ई-गव्हर्नन्स कार्यशाळेमध्ये आयोजित सत्रात ई-गव्हर्नन्स प्रकल्प व नवीन उपक्रम याबाबत त्यांचे सादरीकरण झाले त्या वेळी ते बोलत होते.आगामी वर्षाचे नियोजन महापालिकेने केले असून फेसबुक सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ई-गव्हर्नन्सचे वेगवेगळे नमुने तयार करण्यात आले आहेत. आगामी वर्षामध्ये नागरिकांसाठी प्रत्येक प्रभागात नागरी सुविधा केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. मोबाईल अँप्सच्या माध्यमातून येत्या वर्षात टप्पा एक व टप्पा दोन अंतर्गत विविध सेवा सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सादरीकरणावेळी सांगितले.