Friday, 20 September 2013

दोन युवतींचा विनयभंग करणारे दोघे ...

शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन युवतींचा विनयभंग झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रहाटणीतील नखाते वस्तीमध्ये मंगळवारी (दि. 17) आणि निगडी प्राधिकरणात सोमवारी (दि. 16) ही घटना घडली. या प्रकरणी सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्यात युवतींच्या तक्रारवरून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

काळ आला होता, पण.....!

वेळ संध्याकाळी साडेसातची....लोणावळ्याहून पुण्याकडे जाणारी लोकल कासारवाडी स्थानकावरून सुटली....रेल्वे फाटकावरील नियंत्रकाने फाटक खाली घेतले......परंतु, रेल्वे मार्गावर अजून काही वाहने अडकलेली.....सुदैवाने स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे लोकलला पुढे जाण्यास सिग्नल मिळाला नाही आणि ती फाटकापासून काही अंतरावर येऊन थांबली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेवरून कासारवाडी रेल्वे

मारुतीकारवर सुमो आदळून कारमधील दोन ...

'फास्टट्रॅक'मध्ये गाडी थांबविल्याचा परिणाम
पिंपरी-चिंचवडमधून जाणारा पुणे-मुंबई महामार्गाचा मुख्य रस्ता हा 'फास्टट्रॅक' म्हणजे विना अडथळा वाहन चालविण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. मात्र, वाहनचालक सर्रासपणे या मार्गावर वाहन उभे करून अपघाताला आमंत्रण देण्याचे काम करतात. आज

पिंपरीत महापौर, आयुक्तांच्या मोटारीचे दिवे काढले - शासन आदेशानुसार कार्यवाही

पिं-चिं. महापौर मोहिनी लांडे यांच्या मोटारीवरील लाल दिवा, तसेच पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या मोटारीवरील अंबर दिवा काढून टाकण्याचे आदेश पालिका प्रशासनास प्राप्त झाले आहेत.

आळंदीकरांकडून ‘स्थायी’चा निषेध

पिंपरी : संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे संजीवन समाधिस्थळ असलेले आळंदी हे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे श्रद्धास्थान आहे. वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक पंढरी असलेल्या या आळंदीला देवाची आळंदी संबोधले जाते. त्या आळंदीबद्दल चोरांची आळंदी असे अनुद्गार महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी काढले. त्यामुळे आळंदी नगर परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेत येऊन स्थायी समिती पदाधिकारी, सदस्यांचा निषेध नोंदवला. माफी मागावी, अशी मागणीही केली. 

नागरिकांकडून नऊ हजार मूर्तींचे दान

पिंपरी -&nbsp गणेश विसर्जनाच्या दिवशी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले.

खंडित वीजपुरवठ्यामुळे संगणक यंत्रणा कोलमडली

पिंपरी -&nbsp बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेची संगणकीय यंत्रणा कोलमडली.