पिंपरी : राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात भारतीय जनता पक्षास मिळालेले यश आणि दिल्लीतील आमआदमीचे यश याबद्दल शहरातील विविध भागांत आनंदोत्सव करण्यात आला. पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 9 December 2013
सुनावणीकाळात पाच कोटींचा भरणा
पिंपरी : मागील महिन्यात नोटीस पाठवून १४७0 व्यापार्यांना एलबीटी बाबतच्या सुनावणीस बोलावण्यात आले होते. या सुनावणीच्या कालावधीत एलबीटी भरणा रकमेत ४ कोटी ८६ लाखांची वाढ झाली आहे. ज्या व्यापार्यांनी अद्यापही प्रतिसाद दिला नाही, त्यांना आवाहन केले आहे. ३0 हजार व्यापार्यांना एलबीटी प्रमाणपत्र त्यांच्या दुकानात जाऊन वितरित केले जात आहेत. यापुढे कठोर कारवाईची भूमिका स्वीकारावी लागेल, असे एलबीटी विभागाचे सहायक आयुक्त यशवंत माने यांनी सांगितले.
भेदभावाची नको; सरसकट कारवाई करा
पिंपरी : भूसंपादन होईल, मोबदला दिल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन देणारे महापालिकेचे अधिकारी रहाटणीतील सर्व्हे क्रमांक ५९ मध्ये राहणार्या नागरिकांना अतिक्रमण कारवाईची भीती दाखवू लागले आहेत, अशी तक्रार नोंदवून १२ मीटर रस्त्यासाठी बाधितांवर सरसकट कारवाई करावी, विशिष्ट लोकांना टार्गेट करू नये, अशी विनवणी तेथील रहिवाशांनी महापालिका प्रशासनास केली आहे.
'जिजामाता'तील एक्स-रे मशिन भोसरी येथे हलवणार
महापालिकेच्या जिजामाता रूग्णालयाचे नुतनीकरणाचे काम सुरू झाले असल्याने रूग्णालयातील अत्याधुनिक एक्स-रे मशिन भोसरी रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. या स्थलांतरणासाठी तब्बल एक लाख रूपये खर्च होणार आहे.
सांस्कृतिक भवनाच्या नामकरणाचा राष्ट्रवादीचा डाव
मोहननगर येथे उभारण्यात येत असलेल्या सांस्कृतिक भवनाचे राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन असे नामकरण करण्याचा प्रस्ताव 2011 मध्येच मंजूर झालेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत पाशवी सत्तेच्या बळावर वेगळे नामकरण करण्याचा डाव रचला जात आहे. मात्र राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाला विरोध करून वेगळे नामकरण करण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन
रोड स्विपर मशिन देखभालीसाठी 'बीव्हीजी'ला मुदतवाढ
'जेएनएनयुआरएम' योजने अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई करण्याकरिता खरेदी केलेल्या तीन रोड स्विपर मशिनच्या देखभाल व दुरूस्तीसाठी बीव्हीजी इंडिया या सध्याच्या ठेकेदार कंपनीलाच दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेमार्फत घेण्यात आला आहे.

अखेर नढेनगरमध्ये प्रलंबित रस्त्याचे काम सुरु
प्रभाग क्रमांक 46 (काळेवाडी) मधील नढेनगरमध्ये 30 वर्षांपासून प्रलंबित रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाला.
या वेळी विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर,
Subscribe to:
Posts (Atom)