Saturday, 1 February 2014

प्रभाग समिती अध्यक्षपदाची 6 फेब्रुवारीला निवडणूक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समित्यांची फेररचना झाल्यामुळे प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी महापालिकेला मुदतपूर्व निवडणूक घ्यावी लागणार आहे. येत्या 6 फेब्रुवारीला ही निवडणूक होत असून नव्याने स्थापन झालेल्या दोन प्रभागांमुळे आणखी दोन नगरसेवकांना प्रभागांचे अध्यक्ष होण्याची संधी मिळणार आहे.     

निगडी ते कन्याकुमारी रॅलीला सुरुवात

"इंधन वाचवा; देश वाचवा", "लेक वाचवा; देश वाचवा" असा संदेश देण्यासाठी शहरातील सायकलपटूंनी आयोजित केलेल्या निगडी ते कन्याकुमारी पर्यंत सायकल रॅलीला आज (शुक्रवारी) सुरुवात झाली. यानिमित्त त्यांचा आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी व स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अनधिकृत बांधकामाविषयी सोमवारी निर्णय- लक्ष्मण जगताप

अनधिकृत बांधकामप्रकरणी प्रस्तावावर सोमवारी निर्णय अपेक्षित आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

अनुदानापुरते बचतगट होऊ लागल्याने चांगली चळवळ बदनाम - मोहिनी लांडे

महिलांचे बचत गट ही चांगली चळवळ आहे. मात्र, काही ठिकाणी बचत गटांनी अनुदानाचे पैसे घेतले आणि गट बंद केल्याचे प्रकार घडले. त्यामुळे ही चळवळ बदनाम होऊ लागली, असे महापौर मोहिनी लांडे यांनी सांगवीत स्पष्ट केले.

नवीन मतदार नोंदणी आजपासून पुन्हा

पुणे - शहर व जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली.

"फेसबुक'वरील तक्रारीवरून वाहतूक पोलिस निलंबित

पुणे - वाहनचालकास मारहाण करून पैसे उकळणाऱ्या शहर वाहतूक शाखेतील एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

एच. ए. प्रश्‍नी खासदार सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट



पिंपरी - येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स कंपनीच्या विविध प्रलंबित विषयांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी कंपनीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बुधवारी (ता.