Tuesday, 20 May 2014

महापालिकेकडून सोमवारपासून प्राण्यांचे मोफत लसीकरण

पिंपरी- चिंचवड महापालिका आणि पशूसंवर्धन खाते महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ते 21 मे या कालावधीत महापालिका हद्दीतील गाई, म्हैस आणि बैल यांना लाळ्या आणि खुरकूत मोफत लसीकरण केले जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे म्हणाले की, लाळ्या व खुरकुत या संसर्गजन्य रोगामुळे जनावरांच्या तोंडामध्ये आणि खुरामध्ये व्रण उद्‌भवतात. जनावराच्या तोंडावाटे लाळ वाहते. त्यामुळे जनावरांना चारा खाताना त्रास होतो. खुरामध्ये फोड येतात. खुरामध्ये व्रण झाल्याने जंतूंचे प्राबल्य वाढते आणि संसर्ग होऊन जनावरांच्या हालचाली अतिशय मंदावतात. त्यांना चालणे वेदनादायक होते.

मेट्रो प्रकल्पातील त्रुटी दूर करू


वनाज ते रामवाडी आणि चिंचवड ते स्वारगेटदरम्यानच्या मेट्रो मार्गास राज्य सरकारने मान्यता देऊन केंद्र सरकारकडे अहवाल पाठविला आहे. केंद्र सरकारनेही या दोन्ही मार्गांस तत्त्वत: मंजुरी ... निगडी ते कात्रज हा सर्वाधिक गर्दीचा मार्ग का निवडला नाही, या व अशा अनेक ...

खासदार बारणे बसणार महापालिका सभागृहातही!

निशा पाटील
शिवसेनेचे सहसंपकप्रमुख श्रीरंग बारणे यांनी नगरसेवकपदावरुन थेट खासदारपदावर झेप घेतली आहे. मात्र, स्थानिक प्रश्नांवर महापालिकेत आवाज उठविता यावा यासाठी बारणे आपले नगरसेवकपद कायम ठेवणार आहेत. ते संसदेत खासदार तर महापालिका सभागृहात नगरसेवक म्हणून बसणार आहेत. त्यांच्या या दुहेरी भुमिकेमुळे महापालिका सभागृहाला आगळा-वेगळा अनुभव मिळणार आहे.

लक्ष्मण जगताप यांचा पराभव अन् पिंपरीच्या राजकारणातील ‘सूडचक्र’

बहुचर्चित लढतीत बारणेंच्या बाणातून जगतापांचा ‘वेध’ घेत एक सूडचक्र पूर्ण झाले.

नगरसेवक ते थेट खासदार !

थेरगावमधील एका शेतक-याचा मुलगा, सलग तीन वर्षे नगरसेवक, महापालिकेतील विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर थेट मावळ लोकसभा मतदार संघातील खासदार असा श्रीरंग बारणे यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

राष्ट्रवादी, आपसह मावळात 17 उमेदवारांचे 'डिपॉझिट' जप्त

मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर, आपचे मारुती भापकर यांच्यासह 17 उमेदवारांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. तर शिवसेनेचे मताधिक्य तब्बल दीड लाखाने वाढले तर राष्ट्रवादीचे एक लाखाने घटले आहे. 

पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

नरेंद्र मोदींच्या लाटेने देशाची सत्ता भाजपला मिळाली. आतापर्यंत मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या उद्योगनगरीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे कमालीचा उत्साह संचारला आहे.